आश्वासनाच्या दुसऱ्या दिवसांपासून ‘ट्रामा सेंटर’ सुरू

0
219

मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी पाळला शब्द

पोलीस मित्र संघटना व रायगड संघर्ष समितीच्या पहिल्या मागणीला यश

खोपोली :
शिळफाटा येथील ‘ट्रामा सेंटर’ मागील अनेक दिवसांपासून बंद होते. पण दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी रायगड संघर्ष समिती व पोलीस मित्र संघनेने त्याबाबत उपोषण सुरू केले असता मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी त्वरित ‘ट्रामा सेंटर’ सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 पासून या ठिकाणी कोविड वैक्सीनेशन करीत ट्रामा सेंटर सुरू करण्यात आले आहे.
शिळफाटा येथील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी खोपोली नगर परिषदेकडून लाखो रूपये खर्च करून ‘ट्रामा सेंटर’ बांधण्यात आले होते. मात्र या सेंटरचा योग्य असा उपयोग नगर परिषदेकडून होत नसल्याने ते धूळखात पडले आहे. दरम्यान, जेष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार व पोलीस मित्र संघटना चे रायगड जिल्हा महासचिव- खलील सुर्वे,गोपीनाथ सोनवणे, समाजसेवक सतीश रावळ, माजी नगरसेवक राजू डुमणे यांनी सुभाषनगर येथे संरक्षण भिंत बांधणे, शिळफाटा येथील ट्रामा सेंटर सुरू करणे यासह विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. रायगड संघर्ष समिती व पोलीस मित्र संघनेच्या मागण्यांबाबत तहसीलदार अय्युब तांबोळी यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी अनुप दुरे, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती.
खोपोली नगर परिषद हद्दीतील मागण्यांबाबत मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी सकारात्मकता दर्शविली होती. त्यातील पहिला शब्द पाळत त्यांनी बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 पासून शिळफाटा ट्रामा सेंटर या ठिकाणी कोविड वैक्सीनेशन करीत ट्रामा सेंटर सुरू केले आहे. मुख्याधिकारी यांनी दिला शब्द पाळल्याने रायगड संघर्ष समिती व पोलीस मित्र संघटने कडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.