वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सर्तकतेमुळे पेटत्या गाडीतील चालकाचा जीव बचावला

0
333

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधून जात असलेल्या एका गाडीमध्ये स्पार्किंग होवून अचानकपणे गाडीने पेट घेतला. त्यावेळी तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलिसांच्या सर्तकतेमुळे सदर इसमाचा जीव बचावला आहे.
वाहतुक पोलीस तळोजा परिसरात नो पार्कींगचे कारवाई करीत असतांना तळोजा एम आय डी सी रोडवर पडघाफाटा येथे अचानक पांढ-या रंगाची टी यु व्ही कार नं. एम एच 46 ए पी 3332 या कारला पुढील बाजुस अचानक स्पार्किंग होउन कारला आग लागल्याने पेट घेतला. सदर ठिकाणी तळोजा वाहतुक शाखेतील पोहवा चंद्रशेखर वाघ व पोना ललित शिरसाठ यांनी प्रथमतः कार मधील अडकलेला इसम यास सुरक्षितरित्या बाहेर काढुन प्रसंगाचे भान राखत अग्नीशमन दलाची वाट न बघता रस्त्याने जात असलेला पाण्याचा टँकर अडवून  वाघ व शिरसाठ यांनी सुरक्षेचे साधन नसतांना देखील कारला लागलेली आग विझवली. तसेच आग विझविण्याचे काम सुरू असतांना पो शि बिराजदार व पोशि काचरे यांनी नागरिकांच्या जीवीतास धोका न होउ देता पेटलेल्या कार पासुन  सुरक्षित अंतर राखत योग्यरितीने वाहतुकीचे नियमन केले. सदर ठिकाणी  जमलेल्या  नागरिकांनी  वाहतुक पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक केले.