पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि मोरे हेल्थकेअर आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

0
283

नवीन पनवेल : लोकशाहीची सामाजिक बांधिलकी जपत असताना पत्रकारांचा आहार व आरोग्य सुस्थितीत कसे रहावे त्याचबरोबर पत्रकारांनी कोणती काळजी घ्यावी, या उद्देशाने पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्या संकल्पनेतून मोरे हेल्थकेअर आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेल तालुक्यातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते 12.30 च्या दरम्यान नवीन पनवेल येथील एस.पी.मोरे कॉलेज( S.P. More College) येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांचे पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे उपाध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पनवेल तालुका पत्रकार महासंघाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत, यामध्ये वृक्षारोपण, कुष्टरोगी बांधवांना खाऊचे वाटप,  वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप, आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप,  जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिलांचा यथोचित सन्मान यासारखे अनेक उपक्रम महासंघाच्या माध्यमातून राबविले आहेत.

        आजच्या आरोग्य शिबिरात पत्रकारांच्या अत्यावश्यक शारीरिक तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये रक्तदाब, सोप्या पद्धतीची रक्त तपासणी, ऑक्सीजन पातळी तपासणी, एकूण शारीरिक वजन आणि शारीरिक संतुलन वैद्यकीय सल्ला, शरीरातील वेगवेगळ्या रक्त घटकांची तपासणी या व इतर तपासण्या करण्यात आल्या, तसेच निरोगी आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपस्थित पत्रकारांना माहिती देण्यात आली.

             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार  प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील,  उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, सचिव मयूर तांबडे, खजिनदार सुधीर पाटील, भालचंद्र जुमलेदार, अनिल भोळे, अनिल कुरघोडे,प्रदिप वालेकर,सुभाष वाघपंजे, शेखर भोपी त्याचबरोबर मोरे हेल्थ केअरचे क्लिनिक मॅनेजर आर्यन शेळके, डॉ. प्रिया भट्टाचार्य, डॉ. सिद्धी देवळेकर, प्रशासकीय अधिकारी अनिल मखामले, नर्सिंग कर्मचारी सुजाता आठवाल, संघमित्रा हिवाळे, सुचिता सुतार, कार्यालयीन प्रतिनिधी जान्हवी लोखंडे, बाळाराम पारधी यांनी विशेष मेहनत घेतली.

            यावेळी पनवेल जेष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, विक्रम बाबर, मनोहर सचदेव, राजू गाडे, अविनाश जगधने, अनिल रॉय, प्रथमेश रेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.