नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

0
188

अलिबाग  :- समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम.उज्वला बाणखेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, डॉ.ज्ञानदा फणसे, मुख्य वित्त लेखा अधिकारी श्री.घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रवीण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती जोपासणाऱ्या भारतीयांचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वत:बरोबर इतर नागरिकांना मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.