Home ताज्या बातम्या पनवेल महापालिका क्षेत्रात विजेवर चालणार्या वाहनांची चार्जिंग सेंटर उभारण्याची विरोधी पक्षनेते प्रितम...
नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना चार्जिंग सेंटर उभारण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. पालिका क्षेत्रात विजेवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी चार्जिंग सेंटर उभारून प्रदूषण टाळावे, त्याचप्रमाणे पालिकेने ईलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक सायकल खरेदी करून इंधन बचत करावी आणि प्रदूषण टाळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून आर्थिक मंजुरी देण्यात यावी असे प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.