पेण फेस्टिवल : कल्याणची वृषाली मालावडेकर मिस रायगडची अंतिम विजेती

0
240

पेण – स्वररंग तर्फे पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिवल 2021 मध्ये रविवारी झालेल्या मिस रायगड स्पर्धेत कल्याणची वृषाली मालावडेकर ही मिस रायगडची अंतिम विजेती ठरली. तर नवी मुंबईच्या सानिया सिंघ हिने या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे तर मुरुड मिठेखारच्या हिमानी गायकर हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक नेहा पाटील (पेण), बेस्ट स्माईलचे स्वप्नाली कळमकर (पाली), बेस्ट हेअरचे कल्याणी पाटील (पेण), बेस्ट फोटोजनिकचे धारा विसारीया (डोंबिवली), बेस्ट पर्सनालीटीचे राणी जैसवाल (कामोठे), बेस्ट कॉस्टयूमचे अंजली गायकवाड (मुंबई) या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली. या स्पर्धेत एकूण 21 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. सर्वानीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले. या स्पर्धेसाठी रसिकांनी विशेषतः युवा वर्गानी मोठी उपस्थिती दर्शविल्याने स्टेज सामोरील प्रांगण खचाखच भरले होते.
विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, कोकणातील प्रसिद्ध उद्योजक शामकांत खातू, युवा नेते वैकुंठ पाटील, उद्योजक यशवंत घासे, राजू पिचिका, प्रकाश झावरे, शर्मिला पाटील, खजिनदार भारती साळवी, स्वररंग उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, सारिका पाटील, अनिकेत साळवी, आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
इन्ट्रोड्यूस राउंड, साडी राउंड, वेस्टन राउंड व ईव्हीनींग गाऊन राउंड अशा चार राउंड मध्ये सादर करण्यात आलेल्या या स्पर्धेची कोरिओग्राफी रुपेश चव्हाण (मुंबई) व त्यांचे सहायक कोरिओग्राफर निखिल बाचल यांनी साकारली. तर लोकशाही न्यूज चॅनलचे अँकर ऋषी देसाई यांच्या उत्कृष्ठ समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली. परीक्षक म्हणून सिने अभिनेत्री श्रद्धा पोतदार, डॉ.वैभव ठाकूर, प्रवीण पवार, सेजल सावंत व रायगड शो टॉपर प्रो.अक्षता साळवी यांनी काम पाहिले.
यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश नेने, दिलीप बापट, समिर साने, प्रशांत ओक व सुधीर जोशी यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत रायगड, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, पेण, अलिबाग, उरण, नागोठणे, कल्याण, रेवदंडा आदि विविध भागांतील युवती सहभागी झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षाच्या कोरोनाच्या जागतिक संकट काळानंतर सुंदर असा बहारदार कार्यक्रम सादर केल्याबद्दल स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी व त्यांच्या संपूर्ण टीमला रसिकांनी धन्यवाद दिले. यावेळी निकिता साडी लकी ड्रॉ स्पर्धेची विजेती सौ.सोनल राकेश पवार यांना पैठणी देवून सत्कार करण्यात आला.