Home ताज्या बातम्या खारघर वसाहती मधील नागरी समस्या त्वरीत सोडविण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची पनवेल...

पनवेल : खारघर वसाहती मधील नागरी समस्या त्वरीत सोडविण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगर पालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते, लवकरच पावसाळा सुरु होत आहे या पावसाळ्यामध्ये खारघर मधील सर्वच रस्त्यावर झाडांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या फांद्या किंवा झाडांची पाने यांची छाटणी करणे अत्यंत गरजेचे आहे. खारघर हिरानंदानी पासून ते सेक्टर ४० पर्यंत रस्त्यावर असणाऱ्या झाडांच्या फांद्या वेळोवेळी छाटणे गरजेचे बनले आहे त्यामुळे अपघात टळण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे गटारांची साफसफाई, मोठे नाले साफ करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे आदी कामे पनवेल महानगर पालिकेने तातडीने करणे गरजेचे आहे तरी या नागरी समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांनी या वेळी केली आहे.