वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

0
561

पनवेल : अफाट लोकप्रियता असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ७१ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
सर्वसामान्यांचा आधारवड असेलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकासाठी मदतीचा ओघ दिला आहे. महापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती लोकांवर आलेले संकट आपले आहे, असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सतत कार्य केले आहे. वाढदिवसाचे निमित्त असले तरी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील उतुंग व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. मागील वर्षी कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने वाढदिवस घरगुती व साध्यापणाने साजरा झाला असला तरी तब्बल ०१ लाख कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाच्या अनुषंगाने वैद्यकीय सामुग्री देऊन त्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित केले होते. यंदा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा सन्मान सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, रक्तदान शिबीर, रुग्णवाहिका लोकार्पण, मी मराठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, शालेय साहित्य वाटप, विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन, अशी विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आली.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पनवेल येथील निवासस्थानी देऊ नये असे आवाहन करण्यात आले होते, मात्र सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिष्टचिंतन करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्या सर्वांचा मान ठेवत शुभेच्छांचा स्विकार केला. तत्पूर्वी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, स्नुषा वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह कुटुंबातील महिलांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औंक्षण केले.