आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे योग दिन साजरा

0
49

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती

पनवेल : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य सेवा समिती, पनवेलचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले यांनी योगा संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, बेलवलीच्या सरपंच संगिता भूतांबरा, सतीश पाटील, सदस्य दिनेश पाटील, अमिता पवार, हेमंत तांडेल, रोहन घरत, चिन्मय समेळ, अभिषेक भोपी, विशाल पवार, आशिष कडू, मयूर कदम, पवन भोईर, साधना पाटील, यांच्यासह युवा, व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी योगसाधना केली.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करते. २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात केली होती. त्यानंतर २१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. पंतप्रधान मोदींचा हा ठराव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला, जो संयुक्त राष्ट्रामध्ये कोणत्याही दिवसाच्या ठरावासाठी सर्वात कमी वेळ आहे. योगाभ्यासाचे महत्त्व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. त्यातील बहुतेक स्वामी विवेकानंदांनी प्रसिद्ध केले होते. योगा केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणत नाही तर जास्तीत जास्त मानसिक शांती देते. यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. यासह, हे शरीराच्या सर्व क्रियाकलापांवर देखील नियंत्रण ठेवते. सुख, दु: ख, प्रेम यासारख्या जीवनातील सर्व अभिव्यक्तींवर योगाचे नियंत्रण असते.शरीराचा रक्त प्रवाह योगाद्वारे नियंत्रित केला जातो, ज्यामुळे शरीरात चपळता येते, जे हानिकारक विष काढून टाकते, ज्यामुळे शरीराचे विकार दूर होतात आणि रुग्णांना त्यातून आराम मिळतो. त्याच वेळी, सकारात्मकतेची भावना वाहते. ज्यामुळे शरीर निरोगी राहते, त्या अनुषंगाने योग दिनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्य साधारण महत्व निर्माण झाले आहे.

योगामुळे अनेक दुर्धर आजार बरे होतात. त्यामुळे योगाचे आरोग्या दृष्टीकोनातून आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव तंदुरुस्त राखण्यासाठी व त्याची सेवा दिर्घायुष्य पर्यत्त घेता यावी यासाठी योगासनाची मदत होऊ शकते. त्यामुळे स्वतःला दिर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या पुढील आयुष्यामध्ये योगसनांचा अभ्यास सर्वांनी करावा. –                                                                                 आमदार प्रशांत ठाकूर