प्रितम म्हात्रेंच्या साधेपणाने भारावले सुरक्षा रक्षक

0
335

पनवेल : पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे हे नेहमीच आपल्या ‘डाऊन टू अर्थ’ वृत्तीमुळे जनमानसात घर करून असतात. प्रितम म्हात्रेंच्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांनी पनवेल महापालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्या उभ्यानेच केलेल्या भोजनाप्रसंगी आला.
शुक्रवारी रात्री १२ वाजता पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या ७३ सदस्यांची पहिल्या पंचवार्षिक मधील मुदत संपली. मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दुपारी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आपल्या दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून कार्यालयाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रितम म्हात्रे यांनी पालिकेतील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयीन स्टाफच्या भेटीगाठी घेऊन प्रत्यक्ष आभार मानले. त्यादरम्यान तळमजल्यावर आल्यावर सुरक्षा रक्षकांचे आभार मानण्यासाठी प्रितम म्हात्रे त्याठिकाणी गेले असता जेवणाची सुट्टी असल्यामुळे सुरक्षा रक्षक जेवत होते. त्यावेळी प्रितम म्हात्रे यांना पाहून सर्व सुरक्षा रक्षक कर्मचारी उठून उभे राहिले. त्यावेळी प्रितम म्हात्रे यांनी नम्रपणे सर्वांना नमस्कार करून त्यांना बसण्याची विनंती केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी सहजपणे ‘जेवायला या ‘ असे प्रितम म्हात्रे यांना सांगताच क्षणाचाही विलंब न करता उभ्या उभ्यानेच प्रितम म्हात्रे यांनी सुरक्षा रक्षकांबरोबर जेवायला सुरुवात केली. त्यामुळे सारे सुरक्षा रक्षक भारावून गेले.
पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते पालिकेतील सुरक्षा रक्षकांबरोबर उभ्यानेच जेवत असल्याचे पाहून पालिकेत आलेल्या नागरिकांनी हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला.