शरयू ह्युंदाई वडखळ येथे ग्रामीण कार महोत्सव

0
326

         पेण : ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड आणि शरयू ह्युंदाई वडखळ यांच्या तर्फे यावर्षी दिनांक 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 6 यावेळेत ग्रामीण कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रामीण महोत्सवमध्ये ह्युंदाई तर्फे अद्यावत SUV वाहनांची रेंज तसेच CNG कार्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या मध्ये ग्राहकांना बुकिंग वरती वेगवेगळ्या आकर्षक सवलतींचा लाभ ही घेता येणार आहे. या मेळाव्यामध्ये ग्राहकांना आपल्या जुन्या वाहनांवर एकसेंज ऑफर तसेच आकर्षक सवलतीच्या दरातील कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नवीन गाड्यांच्या विक्री सोबत शरयू ह्युंदाई ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देत असते. आणि त्याचसाठी या मेळाव्यामध्ये सर्व ह्युंदाई कार्सना मोफत वाहन तपासणी सुविधा देण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहेत. या महोत्सवाचा लाभ पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व जनतेने घ्यावा असे आव्हान शरयू ह्युंदाईचे वडखळ ब्रँच मॅनेजर मुस्तफा सय्यद यांनी केले आहे.