Home ताज्या बातम्या 16 सायकल चोरणार्या विधीसंघर्षग्रस्त बालकास खांदेश्वर पोेलिसांंनी घेतले ताब्यात
पनवेल : नवीन पनवेल परिसरात रहिवाशी सोसायटीमधील लॉक न करता पार्क केलेल्या तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वेगवेेगळ्या ठिकाणावरील 16 सायकली चोरणार्या विधीसंघर्षग्रस्त बालकास खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेेतले असून त्याच्याकडून जवळपास 1 लाख 35 हजाार रुपये किंमतीच्या एकूण 16 रेंजर सायकली हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून नवीन पनवेल, खांंदेश्वर परिसरात महागड्या सायकली चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात अरुणकुमार गोस्वामी यांनी खांदेश्वर पोेलीस ठाण्यात सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलीस उप आयुक्त परि 02, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत, वपोनि चंद्रकांत लांडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय चव्हाण यांचे मार्गदर्षनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि चासकर, पो ह अमित पाटील, पो ह उदय देसाई, पोशि सचिन पवार, पोशि स्वप्नील कोळी यांनी गोपनिय बातमीदार यांचे मदतीने सदर मुलाची माहिती घेवून सदर गुन्हयात एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. व त्याचेकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्यांचेकडुन रक्कम रू 01 लाख 35 हजार रूपये किंमतीच्या एकुण 16 रेंजर सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहे.