पर्यावरणमुक्त करण्यासाठी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा!

0
6

मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांचे आवाहन
450 गणपती मुर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन

खोपोली :
खोपोली शहरातील गणेश विसर्जन अनेक वर्षांपासून विरेश्वर मंदिराच्या तलावात केले जात होते. त्याच तलावातील पाणी खोपोलीकर पिण्यासाठी वापरतात त्यामुळेच पाण्याचा होणारा प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. त्यामुळे खोपोली शहर पर्यावरणमुक्त करण्यासाठी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा, असे आवाहन मुख्याधिकारी, प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी केले आहे.
खोपोलीत घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. यामधील बहुसंख्य गणेश मुर्तीचे विसर्जन विरेश्वर तलाव येथे केले जाते. तलावातील पाणी पालिका पिण्यासाठी वापरत असल्याने विसर्जित मुर्तीमुळे ते प्रदूषित होते. ही समस्या लक्षात घेत पालिका दरवर्षी विविध क्लबच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करत असली तरी त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता परंतु यावर्षी खोपोलीकरांनी या समस्यांचे गांर्भीर्य समजुन घेता बहुसंख्यानी आपल्या बापाचे विसर्जन कृत्रिम तलावात केले. तसेच कारमेल स्कूल जवळ, नेहरू गार्डन शास्त्री नगर, शिळफाटा हनुमान मंदीर, शिळफाटा डिपी रोड, विरेश्वर तलावाशेजारी मोठे कृत्रिम तलावाची व्यवस्था केली गेली होती, तरी या उपक्रमास खोपोलीकरानी चांगला प्रतिसाद दिला. सुमारे 450 गणपती मुर्ती कृत्रिम तलावांत विसर्जीत केले गेले.
मुख्याधिकारी, प्रशासक डॉं. पंकज पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच खोपोलीकरांनी त्याच्या हस्ते आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन केले.