माणगांवातील जोशी वडेवाल्याची दादागीरी ग्राहकांना केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

0
16

माणगाव :
माणगांव रेल्वे स्टेशनच्या लगत मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या माणगांव जोशी वडेवाल्याचा प्रताप हा वेगळाच असून ग्राहक हा देव मानला जात असून या हॉटेलच्या मालकानी चक्क ग्राहकालाच बेदम मारहाण केल्याची घटना माणगांव मध्ये दि.११ सप्टेंबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की सदर जखमी फिर्यादी व साक्षीदार सौ.काव्या अंकित हेलगावकर वय (३२) तसेच अंकित आनंद हेलगांवखर वय(३२) रा.देवभूमी आपार्टमेंट म्हाञे आळी घणसोळी गाव नवी मुंबई येथील असून हे ११ सप्टेंबर रोजी माणगांव जोशी वडेवाले यांच्या हाँटेल मध्ये नाश्ता करण्यास गेले असता त्यानी खाण्यासाठी वडे मागवले असता त्या वड्या मध्ये मीठ जास्त प्रमाणात असल्याने फिर्यादी यांनी आरोपी हाँटेल मालक शुभम ग्यानचंद जयस्वाल याच्याकडे विचारणा केले असता आरोपी यानी त्याच गोष्टीचा मनात राग धरून आरोपीचे वडील ग्यानचंद जयस्वाल ,आरोपीची आई,आरोपीची बहिणी तसेच हाँटेल मधील काम करणारे इतर पाचजणाने फिर्यादी सौ.काव्या हेलगावकर तसेच अंकित हेलगावकर यांना शिव्या देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्यानी फायबरच्या खुर्चीने बेदम मारझोड केल्याने फिर्यादी याच्या गळ्यातील मंगळ सुञ चेन कानातील बाली तोडून नुकसान केले असून माणगांव जोशी वडेवाले शुभम जयस्वाल व त्यांच्या साथीदारांवर माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून पो.नि.निवृत्ती बो-हाडे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पो.नि बेलदार हे पुढील तपास करत आहेत.