माणगाव : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजापेक्षा काकणभर अधिकम्हटले तर अतीशोक्ती ठरणार नाही असे थैमान घातलेल्या पावसाने ढगफुटी पेक्षाही भयानक अवस्था निर्माण केली असून सतत धार कोसळणाऱ्या मुसलधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या निजामपूर भागात रात्रीपासूनच थैमान घातले असून या भागातील नदी, नाले, ओढे इतकेच नाही तर शेतातील खांडीने सुद्धा रुद्रावतार घेतले असून सर्वत्र महापुराचे स्वरूप दिसून येत आहे. त्यामुळे दळणवळणाच्या समस्येमुळे वाहतुकीचा सर्वत्र फज्जा उडाला असून नोकरदरांसह धंदा – व्यवसायांकिना याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.
दिघी पुणे महामार्गावरील निजामपूर खोरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या निजामपूर भागात निजामपूर विले पाटनुस भिरा, याबरोबर निजामपूर बोरवाडी शिरसाट चाच धामनी उंबरडी मार्गे स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगड याच्यासह शिरवली विभागातील कडापे जिते हुबर्डी, बोरमाच, तसेच भाले पानसई मार्गे इंदापूर अशा अनेक गावांचा या मुसलदार कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत काही ठिकाणी दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत.