पनवेल महानगरपालिकेने कोविड लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी व लसीकरणाचे योग्य नियोजन करावे – प्रितम म्हात्रे

715
2272

पनवेल : पनवेल महानगरपालिकेने कोविड लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी व लसीकरणाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी आयुक्ताकडे केली आहे.आतापर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वय वर्षे ४५ पेक्षा जास्त असलेल्या नागरिकांसाठी कोविड लस मिळत आहे. परंतु टीका महोत्सवाच्या दिवशी आणि काही ठराविक दोन-चार दिवस सोडले तर एकही दिवस पालिकेकडे पहिल्या आणि दुसऱ्या लसींचे डोस पूर्णपणे मिळाले नाहीत. नागरिक सकाळी लवकर लसीकरण केंद्राच्या बाहेर रांगा लावू लागले, गर्दी करू लागले व केंद्रामध्ये लस उपलब्ध नाही हे समजल्यावर लस न घेता घरी परतू लागले. पहिला डोस घेतला नंतर दुसरा डोस घेण्यासाठी काही आवश्यक कालावधी आरोग्य खात्याच्या निर्देशानुसार लागतो तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेक दिवस संपले तरी सुद्धा दुसऱ्या डोसची लस त्या नागरिकांना मिळत नाही. या सर्वांच्या मागे लसीकरणासंदर्भात जे काही नियोजन केले आहे ते अत्यंत नियोजन शून्य आहे असे समजते.आता तर १ मेपासून 18 वय असणाऱ्या सर्वांना लसीकरण करणार आहोत. परंतु पनवेल महानगरपालिकेचे या अगोदरचे नियोजन पाहिले असता त्यामध्ये बरेच काही त्रुटी आहेत. त्यात आता १ मे पासून १८ वर्षे पेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांना लसीकरणासंदर्भात एक सविस्तर प्रेस नोट काढावी. त्यामध्ये लसीकरणामुळे होणारे फायदे, लसीकरण का महत्त्वाचे, त्यामुळे होणारे शरीरातील बदल अशा प्रकारचे काही प्रश्न नागरिकांना पडले आहेत याची सविस्तर माहिती आरोग्य विभागाने त्यात द्यावी अशा सूचना विरोधी पक्षनेते  प्रितम  म्हात्रे यांनी केल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार १८ वर्षे पेक्षा जास्त जेवढे नागरिक आहेत आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे केंद्र हे त्यामानाने खूप अपुरे पडतील त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने जास्तीत जास्त लसीकरणासाठी केंद्र निर्मिती करावी व त्या सर्वांची माहिती त्या प्रेस नोट मध्ये जाहीर करावी असे पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे म्हणणे आहे. लसीकरणासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करावे लागतील. जेणेकरून आवश्यक त्या नागरिकांना लवकर लस मिळून कोरोना मुक्त होण्याचे नागरिकांचे प्रमाण वाढेल. असे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.