सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीला परवानगी

890
2511

पनवेल परिसरात घरपोच सुविधा लवकरच सुरु होणार

पनवेल : जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल- 2, फॉर्म इ- 2 व एफएलडब्ल्यू- 2 मद्यविक्री अनुज्ञप्ती मधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली आहेत. तसेच नमुना सीएल-3 अनुज्ञप्तीमधुक फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
          सध्या कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका आहे. त्या अनुषंगाने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच लॉकडाउन घोषित केले आहे. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील मद्य विक्री करण्याच्या दुकानांतून मद्यविक्री प्रतिबंधित करण्यात आली आहे. मात्र रहिवासी सुविधा असलेले हॉटेल आणि इतर सर्व उपहारगृहे व बारमधून घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मध्य विक्रीच्या दुकानातून मध्य विक्री सुरु ठेवण्याबाबत 19 एप्रिल रोजी शासन आदेश काढण्यात आले. त्या आदेशांनुसार घरपोच दारू विक्री लवकरच सुरु होणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीतील मद्यविक्री अनुज्ञप्त्यांची सुरु ठेवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकारी व महापालिका हद्दीतीतील सर्व पोलीस ठाण्यांना पत्र दिले आहेत.

किरकोळ मद्य विक्री सुरु, बंद ठेवण्याचे वेळ

अनुज्ञप्त्यांची प्रकार                         चालू करणे             बंद करणे       घरपोच

एफएल – 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रेते) — सकाळी 7 वा.            सायं 8.00 वा.  — घरपोच

सीएल – 3 (देशी मद्याचे किरकोळ विक्रेते) — सकाळी 7 वा.            सायं 8.00 वा. — घरपोच

नमुना ई (सौम्य बिअर व वाईन्सची हॉटेलमधून विक्री) — सकाळी 7 वा.    सायं 8.00 वा. — घरपोच

नमुना सीएल – 2  (देशी मद्याचे ठोक विक्रेते)   सकाळी 7 वा.          सायं 5.00 वा

ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील

कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्री दुकाने उघडून किंवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास मद्यविक्री दुकानात भेट देता येणार नाही. फक्त होम डिलिव्हरी सुविधा देता येईल यासाठी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.