खांब-रोहे : कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला लाँकडाऊन कोलाड नाक्यावर कोरोना नियमावलीचे पालन करून कडकडीतपणे पाळला जात आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढू लागला आहे.याबाबत शासनाकडून विविध खबरदारीचे उपाय अवलंबले जात आहेत.तर वाढत्या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठीचा जालीम उपाय म्हणून लाँकडाऊन हा मोठा पर्याय असल्याने सर्वत्र लाँकडाऊन पुकारला आहे.कोलाड-आंबेवाडी व.वरसगाव नाक्यावर देखील कोरोना नियमावलीचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले असल्याचे दिसत आहे. कोलाड पो.निरिक्षक सुभाष जाधव आणि सर्व पोलिस कर्मचारी यांनी याबाबतअतिशय दक्षता घेतली असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे. तसेच आंबेवाडी,वरसगाव व कोलाड ग्रा.पंचायत प्रशासन यंत्रणेनेही याबाबत आपले महत्त्वपूर्ण सहकार्य दर्शवून लाँकडाऊन कालावधीत संपूर्ण कोलाड नाक्यावर कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन केले जात आहे.स.७ ते ११ या नंतर अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार प्रशासनीचे नियमानुसार हे पूर्णपणे बंद ठेवले जात आहेत.तर विनाकारण फिरणाऱ्यांना वचक बसावी यासाठी पोलिस यंत्रणांही ठिकठिकाणी तैनात केली असल्याचे दिसत आहे. तर कोलाड-खांब-सुतारवाडी आदी विभागातील ग्रामीण भागात देखील फिरते पोलिस पथक कार्यन्वित करण्यात आले आहे. याद्वारे जेणेकरून नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी घेऊन आपले संरक्षण करावे.या पथकाद्वारेही जनजागृतीचे काम उत्तमरित्या पार पाडले जात आहे.