भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
264

पनवेल :  भारती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्षापूर्ती निमित्ताने श्री साई देवस्थान साई नगर येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमा प्रसंगी हिंगोलीचे माजी आमदार भाऊसाहेब गोरेगावकर त्यांच्यासमवेत प्रभाकर पवार (संचालक जालना जिल्हा मध्यवर्ती बँक), शिवराज पाटील, रणजित गोरेगावकर तसेच रामकृष्ण महाराज वहाळकर, रविंद्र का.पाटील (संस्थापक अध्यक्ष श्री साई देवस्थान साई नगर वहाळ) एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी वैद्यकीय शिबीराचा लाभ घेवून आरोग्य तपासणी करून घेतली.