नवीन पनवेल : जुलै महिन्यात पनवेल तालुक्यातील शिवणसई येथील किसन झिट्या कातकरी याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या नातेवाईकांना पनवेल तहसील कार्यालयातर्फे 4 लाखांची मदत करण्यात आली आहे . पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते किसन झिट्या कातकरी यांची मुलगी विठाबाई गंगाराम हिलम यांच्याकडे ४ लाखाचा चेक देण्यात आला आहे. यावेळी दुन्द्रे सरपंच अनुराधा वाघमारे, दुन्द्रे तलाठी आर एन मांढरे, मनसेचे विश्वास पाटील , विठ्ठल पाटील उपस्थित होते.
पुरात किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहून गेलेल्या व्यक्तीस प्रत्येकी चार लाखांची मदत देण्याची तरतूद आहे. त्यामुळे गाढी नदीत वाहून गेलेल्या शिवणसई येथील किसन झिट्या कातकरी याच्या नातेवाईकांना पनवेल तहसील कार्यालयामार्फत चार लाख रुपयांची मदत मिळाली आहे. जुलै महिन्यात शिवणसई येथील किसन झिट्या कातकरी याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह कोप्रोली येथील गाढी नदीच्या किनारी सापडून आला होता. दुसर्या दिवशी पनवेल तालुका पोलिसानी त्याची ओळख पटवली. गाढी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पुरात किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहून गेलेल्या व्यक्तीस प्रत्येकी चार लाखांची मदत देण्याची तरतूद असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांना ही मदत देण्यात आली.