नारायण राणेंच्या वक्तव्याने पनवेल विधानसभा शिवसेनेकडून खारघरमध्ये निषेध आंदोलन

0
170

पनवेल:

             शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने खारघर येथे देखील शिवसैनिकांमध्ये आज संताप दिसून आला. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार भाषेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत संतप्त प्रतिक्रिया देखील विविध ठिकाणी उमटल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या विरोधात खारघर येथे शिवसेना पनवेल विधानसभा यांच्यावतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच नारायण राणे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख , युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सर्व शहर अधिकारी, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, उपतालुका संघटिका टीया अरोरा-धुमाळ, उपमहानगर संघटिका रीना पाटील, शहर संघटिका अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका संगीता राऊत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.