महामार्गावर रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवा : शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत

0
203

पनवेल :  प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी ही दिनांक ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक श्री गणेश उत्सवाकरिता मोठ्या प्रमाणावर भाविक, भक्त-चाकरमानी मुंबई, सायन, पनवेल, गोवा महामार्गावरुण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्हात जाणार आहेत.
ठाणे जिल्हयातील मूंब्रा-शिळफाटा व कल्याणकडून येणारी वाहनांची संख्याही मोठी असते, नवी मुंबई वाहतूक विभागाकडुन या करिता, यथायोग्य नियोजन केले जाते, परंतु ह्या वर्षी श्री गणेश उत्सव काळात कोकणात जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फूल झाल्याने मुंबई-गोवा महार्गाने कोकणात जाणार्‍या वाहनांची संख्या ही दरवर्षी पेक्षा जास्त असू शकते. नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत टोलनाका ते पळस्पा फाटा, नेरूळ, फ्लाय ओव्हर, तुर्भे फ्लाय ओव्हर सी.बी.डी. सर्कल, खारघर प्लाय ओव्हर, कोपरा गाव, खारघर, टोल नाका, कामोठे-कळंबोली सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शिळफाटा मुंब्रा मार्गे येणार्‍या व एम.आय.डी.सी. तून येणार्‍या अवजड वाहनांमुळे ही गणेशोस्तव काळात वाहतूक कोंडी होते. गणेशोस्तव काळात मुंबई गोवा महामार्गावरही नवी मुंबई पेण-वडखळ, माणगांव, महाड, गोरेगांव, मुरुड,जंजिरा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमी वाहतूक करणार्‍या वाहनांपेक्षा अतिरिक्त लाखो वाहने व गणेशभक्त प्रवास करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबई गोवा महामार्गावर संभाव्य अपघाताची संख्या वाढू शकते, अश्या वेळी आपल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या महामार्गावरील प्रत्येक जिल्हयातिल सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत प्रत्येक वीस किलोमीटर वर उपलब्द करून देण्यात यावे. अशी मागणी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त कोकण विभाग, जिल्हाशल्यचिकित्सक अलिबाग रायगड व सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.