खारघर परिसरातील शेकडो जणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

0
182

पनवेल : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन, शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने खारघर शहर सेक्टर-21 येथील संदीप गोसावी यांच्या सह शेकडो पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. त्या प्रसंगी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.