
पनवेल : खारघर वसाहतीमध्ये दयनीय अवस्था झालेले रस्ते, ड्रेनेजच्या लाईन जॅम त्यामुळे साठणारे पाणी व वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या त्यामुळे होणारा वाहन चालकांना त्रास या संदर्भात आज युवा सेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे कार्यकारी अभियंता तात्याराव अहिरे यांची भेट घेवून त्यांच्या समोर या समस्येचा पाढा वाचण्यात आला.
यावेळी अवचित राऊत युवासेना उपजिल्हा अधिकारी, अनिकेत पाटील उपविधानसभा अधिकारी, विनोद पाटील खारघर शहर अधिकारी, मिथुन पाटील शहर चिटणीस, प्रेम ठाकुर विभाग अधिकारी, निखील पानमंद, अजय कदम, संतोष शिंदे, सागर जाधव, योगेश महाले, सुधीर शिंदे, विजय रोकडे, समीर वर्गट, अश्वीन ससाने, सुदर्शन खंडागळे, आदी युवासैनिक उपस्थित होते. या बैठकीस बोलताना अवचित राऊत यांनी सांगितले की, आजमितीस खारघर शहरातील प्रमुख समस्या असलेल्या खराब रस्ते व प्रत्येक चौकात व मार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे खारघर खड्डेघर बनले आहे व याचा दैनंदिन त्रास सर्वसामान्य वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तसेच पावसात दुचाकी स्वारांना अपघातास सामोरे जावे लागत असल्याने नागरीकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच रस्त्यालगत दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या वाढलेल्या फांद्याचा त्रास वाहनांना होत आहे त्यांची छाटणी होणे गरजेची आहे. व सततच्या होणार्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी ड्रेनेज लाइन जॅम झाल्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचत आहे तसेच सांडपाणी व घाणपाणी रस्तांवर येऊन त्याचा दुर्गंध पसरत आहे. या सर्व समस्यांवर त्वरीत सिडकोने कार्यवाही करुन सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या सोडव्यावात अशी मागणी त्यांनी केली आहे.