पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार आजिवली येथे जनता विद्यालयात आज (दि.०१) शासकीय दाखले वाटप शिबीर संपन्न झाले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उदंड प्रतिसाद दिला.
या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर शिबिराचे उदघाटन भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठनेते सुभाष जेठु पाटील, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, युवा मोर्चा ग्रामिण तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा भागीत, ज्ञानेश्वर पाटील, युवानेते योगेश लहाने, घनश्याम पाटील, महेंद्र गोजे, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांच्यासह तहसील कार्यालय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणी नुसार ग्रामीण व शहरी भागात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली व आजिवली येथे दाखले वाटप शिबीर पार पडले असून शुक्रवार दिनांक ०८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात तर मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गव्हाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये हे शिबीर होणार आहे. या शिबिरामध्ये रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.