श्री रत्नेश्वरी मंदिर वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

0
180

उरण : भाविक भक्तांच्या हाकेला धावून येणारी, भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले उरण तालुक्यातील जसखार येथील श्री रत्नेश्वरी मंदिराच्या अस्तित्वाला विविध विकास कामांमुळे धोका निर्माण झाला आहे. श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिरामागील ब्रिज मुळे मंदिराला जे तडे गेले आहेत़ आणि  मागील 2 वर्ष या ब्रिजच्या भरावामुळे गावात पावसाचे पाणी जाऊन जे गावातील लोकांचे नुकसान झाले आहे. या समस्या संदर्भात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदितीताई सुनील तटकरे यांची जसखार गावातील युवा सामजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी भेट घेतली. त्यांना 40 पानांचे समस्या संदर्भात फाईल  देण्यात आली. लवकरच जे एन पी टी प्रशासन सोबत या बद्दल मीटिंग घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी युवा सामजिक संस्थेला दिले आहे. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन मंदिर व इतर समस्या संदर्भात निवेदन दिले. यावेळी या समस्या संदर्भात जे एन पी टी प्रशासना सोबत मंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर चर्चा केली व हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन युवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.