स्वकष्टातून स्वावलंबी तरुण पत्रकाराने केली चक्क झेंडूची शेती

0
211

उतेखोल / माणगांव :
सध्याची सुशिक्षीत वाढती बेरोजगारी व जागतिक आर्थिक मंदीत अनेक तरुण नोकरी व्यवसायाच्या शोधात भरकटत आहेत. अशातच कोरोना वैश्विक महामारी निसर्ग संकटांची मालिका सुरु आहे. अशा विपरित परिस्थितीतही पत्रकारितेत पदवीधर तसेच संगणकाचे अद्यायावत ज्ञान, न्युज चॅनलचे कार्यकारी संपादक पदी सेवा करुन पत्रकारितेत मास्टर्स होण्याचे उराशी स्वप्नं बाळगलेल्या माणगांव तालुक्यातील विकास काॅलनी येथील प्रतिक मोरे या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने स्वकष्टातून स्वावलंबीपणे कमाई करण्याचे हेतुने माणगांव उमरोली येथे जवळपास २० गुंठे जमिन क्षेत्रात चक्क झेंडूची शेती केली आहे.
त्याने कलकत्ता झेंडूच्या ०२ हजार रोपांची लागवड करुन नैसर्गिक संकटाला न घाबरता जवळपास तिन महिन्याच्या कालावधीत केशरी-पिवळ्या झेंडूच्या फूलांची शेती बहरवली आहे. अधुन मधुन पडणारा पाऊस वादळवारा याचा सामना करत त्याने लावलेल्या कलकत्ता जातीचे झेंडूचे उत्पादन आता बाजारात विक्रीसाठी तयार झाले असुन ग्रामीण भागात शेती करून आज हा तरुण झेंडूची फुलं घरपोच विकत आहे. ही उत्तम दर्जाची फुले ४ ते ५ दिवस ताजी राहतात, फ्रिजमध्ये ठेवल्यास आणखी दहा पंधरा दिवस चांगली टिकतात. गणपती, दसरा, दिवाळी या सणावारात या फूलांना चांगली मागणी असते. झेंडू शेती केली अन् वादळवारा गडगडाटासह पडलेल्या पावसात झेंडूची रोप पडली होती तरी पण न डगमगता सर्व पडलेल्या रोपांना आधार देत निगा राखत पून्हा ती उभी करुन जवळपास सहा ते सात वेळा योग्यती फवारणी केली कारण फूलांना रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये त्यामुळे जरी उत्पादन खर्च वाढत असला तरी कठोर मेहनतीने रोजगाराची चांगली संधी मिळु शकते याचे उत्तम उदाहरण प्रतिकने दाखवुन दिले आहे.
त्याचेशी संपर्क करुन माहीती घेतली असता तालुक्यातील लोकांना आता शेतातून थेट घरपोच फूले विकण्याचा आपला मानस असल्याचे सांगत माणगांवकरांचे चांगले सहकार्य मिळेल यासाठीच आता सणावारांचे या दिवसात ताजी टवटवीत झेंडूची फूले या होतकरु तरुण शेतकऱ्यांकडून खरेदी करुन त्यांना प्रोत्साहीत करावे अशी आशा व्यक्त केली आहे. अनेकांनी बोध घ्यावा अशीचही झेंडूची शेती आहे.