
मुरुड : शेकडो नव्हे तर हजारो किलोमीटरचा प्रवास करून पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच व काळेभोर डोळे असे मनमोहक रूप असलेल्या सीगल पक्षांच्या थव्यांचे मुरुड समुद्र किनारी नुकतेच आगमन झाले आहे, साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या पक्षांचे परदेशातुन साधारण दोन हजार किलोमीटर प्रवास करून येथे आगमन होते ते साधारण उन्हाळ्याची चाहूल लागेपर्यंत त्यांचा समुद्रकिनारी मनसोक्त विहार असतो नंतर ते परत आपल्या मायदेशी परततात, येथील समुद्रकिनारी त्यांचे आवडते खाद्य छोटे मासे व खेकडे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने परदेशी पाहुणे असलेल्या सीगल पक्षांचे थवे च्या थवे येथे दाखल होतात, या पांढऱ्या शुभ्र गोंडस पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षी प्रेमी , निसर्ग छायाचित्रकार व पर्यटक या पक्षांची आतुरतेने वाट पाहत असतात , अथांग पसरलेला मुरुड समुद्र किनारा, निळेशार पाणी व सोनेरी वाळूवर या पक्षांचे थवे हे मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात परंतु काही अतिहौशी पक्षीप्रेमी पर्यटक या पक्षांना शेव, गाठी ,वेफर्स सारखे पदार्थ खाण्यासाठी उडवितात , या खाद्याची त्यांना अजिबात गरज नसते परंतु अश्या प्रकारचे खाद्य खाऊन त्या पक्षांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते या बाबत जनजागृती करण्याची विशेष गरज असल्याचे पक्षीतज्ञांचे मत आहे .