“माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत म्हसळा नगर पंचायतीची जनजागृती

0
145

म्हसळा : जगभरात नैसर्गिकरित्या पर्यावरण संतुलन बिघडत चालले असल्याने दरवर्षी काही ना काहीतरी आपत्कालीन घटना घडत आहेत. जमिनीवरील हवा-पाणी मोठया प्रमाणात दुषित होत चालले आहे त्यामुळे मानवाला प्रदूषण, अतिवृष्टी, हिमवृष्टी, भूसंखलन, ग्लोबल वार्मिंग सारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी “माझी वसुंधरा” अंतर्गत पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी निर्देश दिले वरून म्हसळा नगर पंचायत प्र.मुख्याधिकारी विलास लबडे यांचे मार्गदशनाने शहरात नगर पंचायत कार्यालय ते पाभरे फाटा येथ पर्यंत स्वच्छता संदेशाची सायकल रॅली काढुन “माझी वसुंधरा” अभियान राबविण्या बाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. आयोजित रॅलीत शिक्षक, विध्यार्थी, नागरिक यांनी थेट सहभाग घेतला होता. रॅलीत म्हसळा नगर पंचायत करनिर्धार प्र.अधिकारी दिपाली मुंडे, लेखापाल हृदय आंग्रे, समनव्यक प्रियंका चव्हाण, नगर पंचायत कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. वाहनांचा धुर व जैविक कचरा उघड्यावर जाळल्याने हवा प्रदुषित होते तसेच प्लॅस्टिकचा वापर मोठया प्रमाणात होत असल्याने नैसर्गिक आपत्तीच्या अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे या सर्वाला वेळीच आवर घालण्यासाठी  “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत म्हसळा शहरातील नागरिकांनी ओला सुका कचरा उघड्यावर न टाकता त्याची नगर पंचायत मार्फत विल्हेवाट लावण्यासाठी  तसेच आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन म्हसळा नगर पंचायत प्रशासनाने केले आहे.