युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त ‘ भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ चे आयोजन

0
201

पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त ‘ भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ०७ हजार रुपये तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ०५ हजार व ०३ हजार रुपये असून एकूण ३० हजार रुपयांची २० उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. एकूण विजेत्यांना ४५ हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषक ने सन्मानित करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख ०२ नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रोहित जगताप (८६९१९३०७०९), अजिंक्य भिडे (८८५०६४४२०७), देवांशू प्रभाळे (८४३३५१३५४०), किंवा अनिकेत भोईर (९९३०१०४४९९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.