रायगड जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून मान्यता

0
87

उतेखोल/माणगांव :
अलिबाग येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज माणगांव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. एका बाजुला कोरोनाच संकट असतानाही मेडिकल काॅलेजच पाहिलेल स्वप्नं कुठे ही मागे पडता कामा नये यासाठी गेले एकदोन वर्ष सातत्याने पाठपूरावा करून राज्य शासना कडून केंद्राला प्रस्ताव पाठवला होता.
त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशनचे निरिक्षक पथक आपल्या कडे येऊन गेले आणि काल दि. ११ नोव्हेंबर रोजी त्यांचे फायनल लेटर ऑफ परमिशन (एलओपी) प्राप्त झाल्याने आता अलिबाग येथील मेडिकल काॅलेजची स्वप्नंपूर्ती होत असुन विद्यार्थ्यां साठी १०० जागांच मेडिकल काॅलेज यंदाच्या येत्या वर्षाच्या बॅच पासूनच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वेबसाइट वरची पुढल्या वेळची नविन ॲडमिशनची यादी औपचारीक रित्या प्रसिध्द होईल, त्याच्या मध्ये आपल्या रायगडच्या या मेडिकल काॅलेजच नावही असेल अस त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले आहे.
तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे व वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच खासदार सुनिल तटकरे यांनी सुप्रिया ताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नाने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली आणि कोणत्याही अडथळ्याविना इतके सारे प्रस्ताव असतानाही योग्य बाबींची पूर्तता केल्याने महाराष्ट्रातील केवळ दोन मेडिकल काॅलेज, एक सातारा आणि दूसरे रायगडला ही मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले.
तसेच इन्फ्रास्ट्रक्चर साठी आपल्याला सध्या आर.सी.एफ कंपनी चे मोठे सहकार्य लाभल्याचे त्या म्हणाल्या. सिव्हील हाॅस्पीटल मध्ये सुध्दा या काॅलेजच्या व्यवस्थापकिय इमारतींचे काम सुरु आहे. पुढे येथुनच काॅलेजचे डिन व मेडिकल स्टाफ सर्व कारभार पाहतील. तसेच येथिल इतर १५ ते १६ कोटी च्या कामांसाठी मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले. पुढील विकासात्मक दृष्टीकोनातुन काॅलेजसाठी उसर अलिबाग येथे प्रशस्त ५३ एकर जागा मिळाली असुन पुढील काॅलेजच्या नविन इमारत बांधकामासाठी ३५ एकर जागा लागणार व उर्वरीत वाढीव २० एकर जागेत भविष्यात नर्सिंग व आयुर्वेदिक काॅलेज साठी जागा सहजी उपलब्ध राहील.
ॲडमिशनची प्रक्रिया ही इतर शासकिय मेडिकल काॅलेज प्रमाणेच असेल व मेरीटवरच ॲडमिशन मिळेल. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते त्यांना आता येथेच पर्याय उपलब्ध झाला आहे. योगा योगाने आज १२ नोव्हेंबर बर्ड मॅन, पक्षी शास्त्राचे जनक डॉ.सलीम अली यांच्या जयंती निमीत्त किहीम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत साकारण्यात येणाऱ्या डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास केंद्राबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी रायगड जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप, माणगांवच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष केकाने व माणगांवचे पत्रकार उपस्थित होते.