जनसेवा हीच ईश्वर सेवा- रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे प्रतिपादन

0
201

पनवेल : गव्हाण विभागात पहिल्यांदाच गव्हाण विभागीय कॉंग्रेस कमिटी व यमुना सामाजिक शिक्षणिक संस्था, शेलघर यांच्या विद्यमाने तसेच लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट यांच्या सहकार्याने आरोग्य तपासनी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गरीब गरजू लोक या शिबिरात येवून चेष्मा घेवून जाताना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यामुळे पुठच्या वर्षी यापेक्षा मोठ आरोग्य शिबीराच आयोजन करणार असे महेंद्रजी घरत यांनी याप्रसंगी सांगितले.
रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या संकल्पनेतुन व माजी सरपंच वसंतशेठ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं,सदर शिबीरात तज्ञ डॉक्टराकडून डोळे तपासणी करून मोफत 421चष्मे देण्यात आले. कोरोना काळात दवाखाण्यात मोठया प्रमाणात रक्ताचा  तुटवाडा भासत आहे आणि या काळातचं रक्तपेढी मध्ये जास्त रक्त साठा झाला नाही, त्यामुळे अनेक रूग्णांना प्राण गमवावे लागले.आपण एकदा केलेल्या रक्तदानामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचवूंन त्यांचे संसार तुम्ही वाचवू शकता.रक्तदान हे एक श्रेष्ठदान आहे. सदर शिबिरात दमा,मधुमेह,सि.बी.सी,कॉलेस्ट्रॉल,क्रिएटीनीन,डोळे तपासणी या सर्वांना तज्ञ डॉक्टराकडून सल्ले देण्यात आले. हे शिबीर यमुना सामाजीक, शैक्षणिक संस्था शेलघर व गव्हाण विभागीय कॉंग्रेस कमिटी यांच्या सयुक्त विद्यमाने,लायन्स कल्ब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडलं. या शिबिरासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत,लायन दिनेश अग्रवाल, लायन विमल कालरा, रा. जि. महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. श्रद्धा ठाकूर, रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर दीपाली पाटील, सौरभ पाटील, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व गव्हाण विभागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.