घारापुरी बेटावर कायदेविषयक मार्गदर्शन, जनजागृती मोहिमेची सांगता

0
129

          उरण : उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना तसेच ग्रामपंचायत घारापुरी यांचे संयुक्त विद्यमाने घारापुरी बेटावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण न्यायालयाचे न्यायाधीश एन.एम.वाली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बालमजुरी, बाल वयात वाढलेली गुन्हेगारी व आई वडिलांनी मुलांना करायचे संस्कार आदी विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमासाठी उरण न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एन.एम.वाली,सह दिवाणी न्यायाधीश आर.बी.पोळ, दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.एन. पठाडे तसेच उरण तालुका वकील संघटनेचे जेष्ठ विधीज्ञ ॲड.विजय पाटील,ॲड.राजेंद्र भानुशाली, ॲड.नवले,ॲड. किशोर ठाकुर, ॲड. सागर कडू, ॲड.श्रीपाद वासकर आदींसह ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे,सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, सदस्या मीना भोईर, ज्योती कोळी, सुभद्रा शेवेकर, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर,जेष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घारापुरी हे जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ असल्याने ” अतिथी देवो भव!” या उक्तीप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी घारापुरी बेटाचे ऐतिहासिक माहिती दिली. बेटावर शिबिरासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायतीचे वतीने स्वागत करण्यात आले.देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने उरण तालुक्यातही ” न्याय सबके लिए ” या घोषवाक्यानुसार २ आक्टोंबर पासुन १४ नोव्हेंबर पर्यंत मागील दिड महिनाभर सुरू करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन व जनजागृती शिबिरांची रविवारी घारापुरी बेटावर सांगता करण्यात आली.