जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने घारापुरी येथील बांधवांना मिठाईचं वाटप

0
106

उरण : उरण तालुक्यातील घारापुरी वासीयांना उत्तम प्रतीच्या मिठाईच्या पाकिटांचे वाटप जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.तर ह्या दिवाळी भेंट कार्यक्रमाच्या सोबतीला रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण परिसराची साफ सफाई करत तिथे पडलेला कचरा, प्लास्टिक बॉटल्स जमा करून एक स्वच्छता अभियान सुद्धा राबवित सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला गेला.अभियान राबवत असतांना घारापुरी बेटांवरील ( एलिफंटा केव्ज ) तिथल्या इतिहासाची आणि त्या सुंदर भव्य -दिव्य अश्या हेरिटेज वस्तूची समर्पक आणि तितकीच अद्भुत सुंदर अशी माहिती तिथले स्थानिक सुपुत्र आणि पर्यटक मार्गदर्शक अर्थात गाईड्स त्रिकाल पाटील ह्या तरुणाने देत सर्व उपस्थितांचीं मने जिंकली.राणी ताई मुंबईकर, हिराचंद म्हात्रे-उपाध्यक्ष गोल्डन ज्युबली मंडळ सारडे,अनिल घरत- उरण तालुका सचिव आगरी कोळी कराडी संघर्ष सा.संस्था महाराष्ट्र, विलास ठाकूर सेक्रेटरी केअर ऑफ़ नेचर संस्था ,रुपेश खानगे,नितेश मुंबईकर,गोपाळ म्हात्रे , रोशन पाटील, संपेश पाटील, राजेश पाटील, क्रांती म्हात्रे, मिलन पाटील, भूषण भुरे,सोनिक ठाकूर, घारापुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा पाटील , त्रिकाल पाटील, कृपेश भोईर, संदीप पाटील,महिला भगिनी वैष्णवी मुंबईकर, सृष्टी मुंबईकर,प्रतीक्षा म्हात्रे,पूजा पाटील,स्नेहा पाटील,सुप्रिया घरत,महानंदा ठाकूर,जोशना पाटील,माधुरी पाटील, पायल घरत, आणि लहान चिमुकले सोबतच घारापुरी ग्रामस्थांच्या उपास्थितीत हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.