मॅजिकल मॉम्स तर्फे महिला दिन उत्साहात साजरा, ममता प्रितम म्हात्रे यांची विशेष उपस्थिती

0
202

पनवेल : खारघर मधील महिलांनी एकत्रित येऊन स्वतःसाठी काही क्षण द्यावे या उद्देशाने मॅजिकल मॉम इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या प्रोप्रायटर सायमा सादिक यांनी लिटिल वर्ल्ड मॉल खारघर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कविता शेट्टी ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला झाला होता परंतु त्यावर मात करून न घाबरता त्यांनी आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केले, आपल्या कुटुंबाला आपला ही आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने रिक्षा व्यवसाय सुरू करणाऱ्या महिला रिक्षाचालक मनीषा लाकडे, पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिला स्वच्छतादूत ग्रेसी पिल्लई , सखी अगरबत्ती (होप मिरर फौंडेशन) ही महिला संघटना अशाप्रकारे विविध क्षेत्रातील महिलांचा आणि महिला संघटनांचा सन्मान करण्यात आला. 24 हाय (कमर्शियल ऑफिसेस, डी. वाय.पाटील स्टेडियम समोर, नेरूळ नवी मुंबई), गायत्री गोल्ड प्लेसचे अमित जैन आणि ऑर्नेट हॉस्पिटलच्या डॉ. शुभांगी अदाते यांच्या विशेष सहयोगाने घुंगट ब्युटीच्या मिसेस नीता पटेल यांच्या माध्यमातून किरण राजपूत(मिसेज इंडिया अर्थ)यांनी महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन केले होते. तसेच या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सुद्धा त्यांनी केले.  यावेळी नाच डान्स ॲकॅडमीच्या फाउंडर मिसेस श्रेया बसक, स्पार्क डान्स अकॅडमी च्या मिस विनिता रजानी (सेलिब्रिटी कोरिओग्राफर)  कथक अकॅडमीच्या मिसेस अन्कना किर्तनिया या यांच्या (तीहाई) या टिम तर्फे वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स ठेवण्यात आले. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या   महापौर कविता चौतमोल, ममता प्रितम म्हात्रे (संचालिका,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था), नगरसेविका लीना गरड, माजी नगरसेविका शशिकला सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक(गुन्हे शाखा) विमल बिडवे, जुही बजाज वासवानी (जुही डेव्हलपर्स, नवी मुंबई) विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.  हा कार्यक्रम मॅजिकल मॉम इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या प्रोप्रायटर सायमा सादिक आणि किरण राजपूत (मिसेज इंडिया अर्थ) यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.