शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

0
8

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
वर्धा – अमर काळे, दिंडोरी – भास्करराव भगरे ,बारामती -सुप्रिया सुळे, शिरुर- डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगर- निलेश लंके