अलिबाग : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शनिवारी पाटील कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. पेझारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन मिनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पाटील कुटूंबियांची विचारपूस केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नांदेडचे आ. श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्याच्या महिला आघाडी प्रमुुख आशा शिंदे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी (दि.30) शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांची अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांची विचारपूस करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील आदी पाटील कुटूंबिय व कार्यकर्ते उपस्थित होते.