Home ठळक बातम्या माथेरान मधून हातरिक्षा होणार हद्दपार, मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

माथेरान :
देशातील छोटे पर्यटन स्थळ म्हणून कीर्ती असलेल्या माथेरान मध्ये स्वातंत्र्य च्या 78 वर्षानंतर ही माणसांनी माणसांना ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा सुरू होत्या मानवी शरीरातील रक्त हेच इंधन असे हातरिक्षाचे समीकरण होते या अमानुष्य प्रथे विरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करताना या रिक्षा सहा महिन्यांच्या आत थांबविण्याचे निर्देश दिले असून त्या ऐवजी तातडीने इ रिक्षा राज्यशासनाने सुरू करावे असे निर्देश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून हात रिक्षा चालकांची न्यायालयांमध्ये हात रिक्षा बंद करण्याबाबत लढा सुरू होता त्यावरती निर्णय देताना मुख्य न्यायाधीश भूषण आर गवळी नायमूर्ती के विनोद चंद्र आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय देताना आदेश दिले आहेत की भारतासारख्या विकसनशील देशात मानवी प्रतिष्ठेच्या मूलभूत संकल्पने विरुद्ध असलेल्या अशा प्रथेला परवानगी देणे सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या घटनात्मक प्रतिज्ञांना कमी लेखते त्यामुळे ही प्रथा बंद होणे गरजेचे आहे.
माथेरान हे एक पर्यावरण पूरक गिरीस्थान आहे या ठिकाणी आपातकालीन वाहने वगळता मोटारींवर बंदी आहे त्यामुळे पर्यटक व मालवाहतुकीसाठी येथील नागरिक दीर्घकाळ हाताने ओढलेल्या रिक्षांवर अवलंबून होते अशा प्रथा बंद व्हायला हव्यात, या रिक्षा बंद करताना गुजरात मधील केवडिया येथील सरदार पटेल यांच्या सर्वात उंच असलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी स्थानिकांना गुजरात सरकारने इ रिक्षा नाममात्र शुल्काने भाड्याने देऊन येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची सोय केली होती त्या धरतीवर माथेरानमध्ये सुद्धा राज्य शासनाने ई रिक्षा खरेदी करून सदर गरजू ई रीक्षा चालक तसेच इतर नागरिकांनाही ई रिक्षा भाडेतत्त्वावरती देऊ शकतो का या बाबत आढावा घेण्याचे राज्य शासनाला सूचित करण्यात आले आहे.
निधीची उपलब्धता नसणे हे माथेरान येथे ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी न करण्यासाठी निमित्त असू नये असे राज्य शासनाला माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले असून हात रिक्षा सारख्या अमानवीय प्रथेला बंद करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याचे ही सांगण्यात आले असून माथेरान मधील रस्त्यांचा विषय मार्गी लावण्याकरता माथेरान चे प्रवेशद्वार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा रोड क्ले पेव्हर ब्लॉक ने तातडीने करण्यात यावा असे आदेश ही या वेळी देण्यात आले आहेत.
22 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माथेरान भाजपा व रिक्षा संघटनेने 94 हात रिक्षाने परवानगी मिळावी याकरता निवेदन दिले होते व त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व रिक्षांना परवानगी देण्याकरिता आपण जातीने लक्ष देऊ असे शब्द दिले होते त्यामुळे आज या प्रसंगी निकाल लागल्यानंतर माथेरान भाजपा उपाध्यक्ष किरण चौधरी यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.