Home ठळक बातम्या पनवेल येथील मनसे कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
नवीन पनवेल : पनवेल शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांचा हस्ते रविवार 9 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांचे मोठ्या उत्साहात मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाहण्यासाठी आणि त्यांना कॅमेरात टीपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य संचारले. यावेळी जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी मनसे नेहमीच आक्रमकपणे भूमिका मांडेल अशी भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर, योगेश जनार्दन चिले पनवेल महानगर अध्यक्ष व प्रवक्ता, श्री पराग बालड पनवेल महानगर सचिव श्री उल्हास कदम पनवेल महानगर सचिव, श्री संदेश ठाकूर उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, सौ स्वरूपा सुर्वे पनवेल महानगर अध्यक्ष, संदीप जाधव नवीन पनवेल उपशहर अध्यक्ष, रोहन पाटील पनवेल उपशहर अध्यक्ष , सुरज गायकर तळोजा उपशहर अध्यक्ष , राहुल चव्हाण कळंबोली उपशहर अध्यक्ष , मनोज कोठारी कामोठे उपशहर अध्यक्ष, लक्ष्मण वानखेडे खारघर उपशहर अध्यक्ष , अमर पाटील विध्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष, श्री सचिन जाधव रायगड वाहतूक संघटक, किरण गुरव रस्ता स्थापना रायगड संघटक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.